- डॉ. रवींद्र उटगीकर
जागतिक तापमानवाढीमुळे मान्सूनचे गणित बदलताना आपण अलीकडे सातत्यानं अनुभवू लागलो आहोत. हे बदल आपल्या विकासाकांक्षांना खीळ घालत आहेत. ही परिस्थिती बदलण्यासाठी शाश्वत विकासाची कास धरणे गरजेचे. जागतिक जैवइंधन आघाडी हे भारताने या दिशेने टाकलेलं महत्त्वाचे पाऊल आहे. यंदाचा ‘जैवइंधन दिन’ शनिवारी पार पडला. त्यानिमित्ताने या आघाडीच्या सद्यस्थितीचा आढावा.
वेगवेगळ्या दिशांनी तोंड करून आपापलं हित साधण्यात गुंतलो असूनही, या वसुंधरेला अस्थिर करण्याएवढं सामर्थ्य आपल्यामध्ये असेल, तर एकत्र येऊन तिला वाचवण्याएवढंही बळ आपणा सर्वांमध्ये नक्कीच आहे.
- सर डेव्हिड अटेनबरो (पर्यावरणवादी विचारवंत)