बेरोजगारी, शेतीची दुरवस्था हे हरियानातील ज्वलंत प्रश्न विधानसभा निवडणुकांत महत्त्वाचे ठरतील. याबद्दल प्रत्येक पक्षाला स्वतःची भूमिका स्पष्ट करावी लागेल, अशीच तेथील परिस्थिती आहे.
या वर्षाखेरीस जम्मू-काश्मीर, हरयाना आणि महाराष्ट्र या तीन राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी हरियानात पाच ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी तर जम्मू-काश्मिरात अठरा सप्टेंबर ते एक ऑक्टोबर दरम्यान तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांचे निकाल एकाच दिवशी म्हणजे आठ ऑक्टोबरला लागतील. महाराष्ट्राचा नंबर दिवाळीनंतर लागेल.