महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी भारतातील कॉँग्रेसच्या सत्तापुनरागमनाचा रस्ता महाराष्ट्रातून जातो, हे स्पष्ट शब्दात सांगत पक्षाला क्रमांक एकवर यायचेय, असा निर्धार केला आहे. मोदी-शहांच्या विरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातल्या भाजपविरोधी असंतोषाचे जनक मानले तरी नायक व्हायचेय कॉँग्रेसला.