सेमी कंडक्टर उत्पादनाचा कार्यक्रम ठरविताना फार काळजी घ्यावी लागेल. जगातल्या सर्व लोकांचे हितरक्षण होते आहे ना, हे अग्रक्रमाने पाहात राहावे लागेल. हे तारतम्य वैश्विक आणि राष्ट्रीय पातळीवर बाळगावे लागेलच; पण अगदी वैयक्तिक पातळीवरही अनेक गोष्टींमध्ये आपण ते पाळणे आवश्यक आहे.
स्वातंत्र्यदिनी भाषणात पंतप्रधानांनी भारताच्या सेमीकंडक्टर मिशनवर काम सुरू झाल्याचे सांगितले. मार्च मध्ये त्यांनी प्रस्तावित तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांच्या कोनशिलांचे अनावरणही केले होते. गुजरातमध्ये दोन नि आसाममध्ये एक. यातील दोन(चक्क)टाटा उद्योग-समूह सुरू करणार आहे. भाषणाच्या आधी एकदोन दिवसच ते तत्सम तंत्रज्ञानात अग्रगण्य असलेल्या फॉक्सकॉन समूहाच्या प्रमुखांनाही भेटले.