काही देशाचे पत्रकार अनेक देशात वास्तव्य करून तिथल्या बातम्या आपल्या वाचकांपर्यंत किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतात. पण तेथील शासनसंस्थांकडून त्यांना दडपशाहीचा अनुभव येतो.
इस्त्राईल-पॅलेस्टाईन युद्धामुळे पश्चिम आशियात तणाव आहे. अमेरिकी राजकारणातील यहुदींचा प्रभाव लक्षात घेता अमेरिकेला या भागात बरेच स्वारस्य असते. त्यामुळेच पाश्चात्य देशातील अनेक पत्रकार या भागात असतात. पश्चिम आशियातील ‘तेल’ हा घटकही महत्त्वाचाच.