Kartiki Gonsalves : मुक्या प्राण्यांचा ‘आवाज’

नुकताच कार्तिकी यांना ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय आणि राणी कॅमिला यांच्या हस्ते ब्रिटनमध्ये पर्यावरण पुरस्काराने गौरवण्यात आले.
Kartiki Gonsalves voice of animal honored environmental award in Britain King Charles III and Queen Camilla of Great Britain​
Kartiki Gonsalves voice of animal honored environmental award in Britain King Charles III and Queen Camilla of Great Britain​sakal
Updated on

सुशील आंबेरकर

साधारण सहा वर्षांपूर्वी बंगळूरुहून निघताना एका प्रवासादरम्यान दिसलेल्या एका हत्तीच्या पिल्लाला पाहून त्याच्या प्रेमात पडलेली एक निसर्गवेडी तरुणी कार्तिकी गोन्साल्विस आज अवघ्या जगात परिचित आहे.

निसर्गात रमणाऱ्या, विविध संस्कृतींचा अभ्यास करणाऱ्या आणि पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्यांचा आवाज झालेल्या कार्तिकी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’मुळे प्रकाशझोतात आल्या. हत्ती आणि एका आदिवासी कुटुंबातील जीवाभावाच्या नात्याची कथा सादर करणाऱ्या त्यांच्या माहितीपटाची दखल घेत २०२३ चा ऑस्कर पुरस्कार त्यांनी पटकावला तेव्हाच त्यांच्यातील वेगळेपण प्रकर्षाने जाणवले होते.

Kartiki Gonsalves voice of animal honored environmental award in Britain King Charles III and Queen Camilla of Great Britain​
#Environment विद्यार्थ्यांची पुस्तकातून पर्यावरणाशी गट्टी

नुकताच कार्तिकी यांना ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय आणि राणी कॅमिला यांच्या हस्ते ब्रिटनमध्ये पर्यावरण पुरस्काराने गौरवण्यात आले. हत्ती आणि मानव यांच्यातील ऋणानुबंध आणि सहअस्तित्व अधोरेखित करून माहितीपटाद्वारे त्याची विलक्षण कथा सादर करण्याच्या कौशल्याची दखल म्हणून त्यांना मानाचा ‘तारा’ किताब देण्यात आला.

हत्तीची पुतळारूपी ट्रॉफी हातात घेताच कार्तिकी यांच्या चेहऱ्यावरील भाव विलक्षण बोलके होत. मुक्या प्राण्यांचा आणि जंगल-दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या असंख्य मानवी जीवांचा ‘आवाज’ झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होते.

Kartiki Gonsalves voice of animal honored environmental award in Britain King Charles III and Queen Camilla of Great Britain​
Ajit Pawar NCP News: ''हे होणारच होतं! काहीही करा यंदा भाजपा आपटणारच!'' काँग्रेसचा मोठा दावा

कार्तिकी गोन्साल्विस म्हटले तर विलक्षण व्यक्तिमत्त्व. अवघ्या ३६ व्या वर्षात त्यांनी स्वतःला सिद्ध केले. २ नोव्हेंबर १९८६ रोजी त्यांचा जन्म झाला. उटीसारख्या निसर्गरम्य ठिकाणी त्या वाढल्या. त्यांची आई प्रिसकिला टॅम्प्ले गोन्साल्विस यांना भटकंतीची आवड.

साहजिकच इतिहास आणि संस्कृतीत रमणे ओघाने आलेच. वडीलही छायाचित्रकार. आजीलाही निसर्गाचे वेड. कार्तिकी लहान असताना तिच्या घरचे तिला सिनेमा-नाटक पाहायला न्यायचेच नाहीत.

जंगल, निसर्ग, प्राणिसंग्रहालय, मत्स्यालय किंवा म्युझियममध्येच त्यांचा जास्त वेळ जायचा. कार्तिकी यांची जडणघडण तिथेच झाली. त्यांची आई अमेरिकी आहे. त्या आई-आजीबरोबर जंगलात फिरायच्या.

Kartiki Gonsalves voice of animal honored environmental award in Britain King Charles III and Queen Camilla of Great Britain​
Ajit Pawar: सेनेनंतर राष्ट्रवादीतही फूट, अजित पवार सरकारमध्ये होणार सामील

तिथेच तिला प्राण्यांमध्ये राहून त्यांच्या जीवनाबाबत शिकायला मिळाले. अकरावीपर्यंत त्यांच्या घरी टीव्हीही नव्हता. लहानपणी त्यांचा सर्वाधिक वेळ घोडेस्वारी करण्यात जायचा. त्यांचे शिक्षण सेंटर हेल्डर्स स्कूल ऑफ सेंट मायकल अॅकॅडमीमध्ये झाले.

तमिळनाडूतील नीलगिरी लाईट अॅण्ड लाईफ अॅकॅडमीतून त्यांनी छायाचित्रणातील पदविका मिळवली. २००७ मध्ये कोईम्बतूरमधील डॉ. जी. आर. दामोदरन कॉलेज ऑफ सायन्समधून बी.एस्सी. पदवी त्यांनी प्राप्त केली आणि तिथेच त्यांनी आपल्या पॅशनला प्रोफेशनमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर ‘इंडियन नॅचरल हिस्ट्री वाहिनी’साठी फोटो जर्नालिझम केले. सामाजिक विषयावरील माहितीपट बनवले. सहल गाईड म्हणूनही काम केले. कार्तिकी यांचा दृष्टिकोन अगदी थेट होता. पर्यावरण आणि वन्यजीव यांच्यावरील आपले लक्ष त्यांनी ढळू दिले नाही; मग त्यांचे रक्षण असो, त्यांच्याबद्दलची जागरुकता असो की त्यांचे पालनपोषण असो. जंगली प्राण्यांचे जीवन आणि त्यांच्या विविधतेबाबत त्या आजही जागृती करतात.

Kartiki Gonsalves voice of animal honored environmental award in Britain King Charles III and Queen Camilla of Great Britain​
Ranbir Kapoor Animal: आदिपुरुषच्या वादानं 'अॅनिमल' घाबरला! रणबीरचा सिनेमाविषयी मोठा निर्णय

‘अॅनिमल प्लॅनेट’ आणि ‘डिस्कव्हरी’सारख्या निसर्गावर आधारित वाहिन्यांमध्ये कॅमेरावूमन म्हणून काम करतानाही त्यांनी आपले अनोखेपण जपले आहे. निसर्गातील नकारात्मक गोष्टींपेक्षा सकारात्मकतेवर त्यांनी भर दिला. कार्तिकी यांनी बंगळूरुमध्ये टुरिस्ट गाईड म्हणून काम करताना पर्यटकांबरोबर अरुंद गल्ल्याही पालथ्या घातल्या आहेत.

त्यांना सर्वच संस्कृती आणि जातीपातींप्रती प्रचंड आदर आहे.कार्तिकी जंगलात अगदी साधे जीवन जगायच्या. आदिवासी-ग्रामस्थांबरोबर त्यांच्या झोपड्यांत राहायच्या. तिथेच जेवायच्या. आदिवासींशी त्या इशाऱ्याने बोलायच्या. त्यातूनच त्यांना प्राण्यांशी मूक संवाद साधण्याची कला अवगत झाली. एका अर्थाने त्या प्राण्यांचा आवाज बनल्या. अलौकिक कामगिरीने त्यांनी स्वतःची वेगळी ओळख बनवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.