निव्वळ माहिती संपादन करण्याऐवजी मुलांच्या क्षमताविकसनावर भर, स्वयं-अध्ययनावर भर, शिक्षकाची भूमिका ‘शिकवण्याची’ नसून मुख्यतः शिक्षण सोपे करण्याची असावी, यांसारखी नवीन शैक्षणिक धोरणात स्वीकारलेली तत्त्वे विचारी व्यक्तींना लगेच पटतील अशीच आहेत. पण ती हाताळायला सोपी मात्र नाहीत.