मृत्यूपत्र बनवणं का गरजेचं आहे? Legal Will मध्ये नेमकं काय लिहायचं असतं? 

अनेकजण मृत्यूपत्र तयार करण्याकडे गांभिर्याने पाहत नाही. तर अनेकजणांना मृत्यूपत्र ही संकल्पना पटत नाही. काहींना मृत्यूपत्राचं महत्व ठाऊक असलं तरी हे काम म्हणजे वेळखाऊ किंवा किचकट अशा काही कारणांनी ते मृत्यूपत्र तयार करण्याकडे दुर्लक्ष करतात
गरज मृत्यूपत्राची
गरज मृत्यूपत्राचीEsakal
Updated on

मृत्यूपत्र किंवा विल Legal Will म्हणजे एक कायदेशीर दस्तावेज आहे. ज्यामध्ये एखादी व्यक्ती तिच्या मृत्यूनंतर Death तिचे संपूर्ण संपत्ती कुणाला देऊ इच्छिते याबद्दल सविस्तर उल्लेख केला जातो. जिवंत असतानाच कोणतीही १८ वर्षांवरील व्यक्ती जिच्याकडे संपत्ती आहे आणि जिचं मानसिक स्वास्थ्य चांगलं आहे अशी व्यक्ती मृत्यू पत्र तयार करून ठेवू शकते. Law Information in Marathi why it is important to make Legal Will

मृत्यूपत्रात Legal Will  ती व्यक्ती तिच्या मृत्यूनंतर संपत्तीचं विभाजन कसं होईल, व्यवसायाचे Business अधिकार कोणाकडे राहतील, तसचं मुलं लहान असल्यास त्यांचा साभांळ कोण करेल याबद्दलची सर्व माहिती लिहून ठेवू शकते. 

मृत्यूमत्रामध्ये संपत्ती किंवा व्यवसायाचं विभाजन हे केवळ कुटुंबिय किंवा वारसांमध्येच करणं गरजेचं नाही. तुम्ही कुटुंबाव्यतिरिक्त जर इतर कुणाला संपत्ती Property देऊ इच्छित असाल किंवा व्यवसायाचा उत्तरअधिकारी वारस सोडून इतर कुणी असावं अशी इच्छा असल्यास मृत्यूपत्र तयार करणं हा कधीही योग्य निर्णय ठरू शकतो. 

अनेकजण मृत्यूपत्र तयार करण्याकडे गांभिर्याने पाहत नाही. तर अनेकजणांना मृत्यूपत्र ही संकल्पना पटत नाही. काहींना मृत्यूपत्राचं महत्व ठाऊक असलं तरी हे काम म्हणजे वेळखाऊ किंवा किचकट अशा काही कारणांनी ते मृत्यूपत्र तयार करण्याकडे दुर्लक्ष करतात. 

हे देखिल वाचा-

गरज मृत्यूपत्राची
मृत्यूपत्र ठरतेय काळाची गरज

मृत्यूपत्र का तयार करावं?

कोणत्याही व्यक्तीवर कधीही मृत्यू ओढावू शकतो. यासाठी मृत्यूपत्र तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. यामुळे मृत्यूनंतर कुटुंबियांमध्ये संपत्ती किंवा व्यवसायावरून वाद निर्माण होत नाहीत. मृत्युपत्र न बनवता जर एखाद्याचा मृत्यू झाला तर साहजिकच त्याच्या मालमत्तेची वाटणी आणि वारसाहक्क ठरवला जातो. अशावेळी कदाचित चुकीच्या व्यक्तींकडे तुमची संपत्ती किंवा व्यवसाय सोपवला जाऊ शकतो. 

तुम्ही आयुष्यभर कष्टाने कमावलेली संपत्ती ज्याला मिळावी अशी तुमची इच्छा असेल त्या व्यक्तीलाच ती मिळावी, यासाठी मृत्यूपत्र तयार करणं गरजेचं आहे. याशिवाय जर तुमची मुलं १८ वर्षांहून लहान असतील आणि आकस्मिक मृत्यू ओढावल्यास मुलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी देखील विल तयार करणं कधीही योग्य. 

मृत्यूपत्र तयार करताना या गोष्टींची घ्या काळजी

  • मृत्यूपत्रामध्ये तुमचं नाव, वडीलांचं तसंच मुलांची नावं, घराचा पत्ता ही साधारण माहिती देखील योग्य आणि काळजीपूर्वक देणं गरजेचं आहे. 

  • तुम्ही कोणत्या तारखेला मृत्यूपत्र तयार केलंय त्याचा उल्लेख करा.

  • तसचं तुमचं मृत्यूपत्र लिहताना त्यास स्पष्टता असावी. तसचं ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार लिहित आहात ते लिहिण्यासाठी कुणाचाही दबाव नाही हे स्पष्ट लिहावं.

  • त्यात तुमच्या मालमत्तेचा योग्य तपशील द्यावा, तशीच ती मालमत्ता तुम्ही कोणा एकाला किंवा कुटुंबातील कोणत्या सदस्याला किती देऊ इच्छिता हे स्पष्ट लिहावं. 

  • या मृत्यूपत्रावर एखाद्या विश्वासू व्यक्तीची साक्षीदार म्हणून सही घ्यावी. तसंच कुटुंबातील व्यक्ती सोडून इतर सुरक्षित ठिकाणी ती ठेवावी. 

  • तुम्ही मृत्यूपत्र कितीही वेळा बदलू शकता तसंच तुमच्या भाषेतही ते लिहू शकता. 

  • एखाद्या पत्राप्रमाणे मृत्यूपत्र न लिहिता ते कायदेशीररित्या एखाद्या वकिलाच्या मदतीने लिहावं. ज्याला कायदेशीररित्या मान्यता असेल. 

मृत्यूनंतर आपल्या कुटुंबा किंवा मुलांना कोणत्याही अडचणी किंवा संकट आणि समस्यांचा सामना करावा लागू नये यासाठी मृत्यूपत्र तयार करणं आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.