दक्षिण आशियाई राष्ट्रांमधील राजकीय अस्थिरता आणि त्याच्या जोडीला मोठ्या राजकीय नेतृत्वाने राबविलेले भारतविरोधी धोरण यामुळे या राष्ट्रांच्याबाबत चीनला त्यांचे विस्तारवादी धोरण राबवणे अधिक सोपे झाले आहे.
दक्षिण आशियाच्या राजकीय क्षितिजावर गेल्या काही वर्षांत प्रचंड गुंतागुंतीचे काळे ढग दाटून आल्याचे चित्र आहे. यापूर्वी अशी स्थिती कधीच उद्भवली नव्हती. सध्या बांगलादेशात सुरू असलेले राजकीय अस्थिरतेचे नाट्य याचीच साक्ष देते.