न्या. हेमा समितीचा अहवाल नुकताच प्रसिद्घ झाला. त्यात मल्याळी पडद्यामागील ‘डर्टी वास्तवा’वर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. व्यवस्थात्मक शोषणाचे भीषण स्वरूप त्यामुळे उघड आले आहे. त्याविषयी..
‘जुन्या काळी जेव्हा सिनेसृष्टीचे थोडे बरे दिवस होते तेव्हादेखील महिला अभिनेत्रींना लैंगिक छळाला सामोरे जावे लागत असेच; पण आज ज्या प्रमाणात त्याची वाच्यता होते तेवढी पूर्वी होत नसे. कास्टिंग काउचचा प्रकार जुन्या सिनेमातही होताच; पण आज महिला त्याविषयी जाहीरपणे बोलतात’.