ईशान्येकडील राज्यांविषयी भाजपच्या धोरणामुळे नवा वादंग पेटला आहे. त्यामुळे जुन्या जखमा भळभळू लागल्या आहेत. हा वाद लवकर शमण्याची कोणतीही चिन्हे अद्याप दिसत नाहीत. ईशान्येकडील राज्यांवरील शासनाबाबत भाजपच्या दृष्टिकोनाचे ‘मणिपूर’ हे बोलके उदाहरण आहे. भाजप येथे अस्मितांच्या राजकारणाच्या कुरघोडीचा खेळ खेळत आहे.