- प्रा. डॉ. पी. विठ्ठल
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा अखेर विलंबाने का होईना मिळाला. महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदार आणि एकूणच राजकीय नेत्यांची अनास्थाही या विलंबाला कारणीभूत आहे. ‘अभिजात दर्जा’ म्हणजे काय? हेच त्यांना माहीत नसल्याने त्यांनी पाठपुरावाच केला नाही. किंबहुना आपल्या नेत्यांना भाषिक, सांस्कृतिक समजच नसल्याने राजकारणाच्या पलीकडे जाऊन ‘भाषक अस्मिता’ म्हणूनही ते या मुद्द्याला समजून घेऊ शकले नाहीत. पर्यायाने केंद्र सरकारवर जो एक दबाव निर्माण व्हायला हवा होता, तो झाला नाही.