कु. सरोज चंदनवाले
नअस्कार! माझ्या मायमराठीची स्टार व्हॅल्यू गेल्या काही दिवसात प्रचंड वाढली आहे, यात शंका नाही. (पण कोणाला शंका आहे?) दिल्लीत फेब्रुवारीत होणाऱ्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. ताराबाई भवाळकरांची निवड झाली आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी वेगानं घडल्या. मराठी भाषेच्या तारांगणात काहीतरी मोठी घडामोड झाल्याची नोंद केंद्र सरकारच्या भूकंपमापन यंत्रणेवर झाली. संरक्षक उपाय म्हणून केंद्रानं ताबडतोब मराठी भाषा अभिजात असल्याचं जाहीर करुन टाकलं.