नअस्कार! जीव द्यावा की चहा प्यावा? टुबी ऑर नॉट टुबी? या संभ्रमात मी किती फुलांच्या पाकळ्या गेले काही दिवस उपटत्ये आहे, याची मोजदाद करता येणार नाही. कोथरुडातली झेंडूची फुलं संपली!! माझी माय मराठी, मावशी कोंकणी आणि आत्या कन्नड असं मी आजवर समजत होत्ये. पण आमचे लाडके बरौपी दामोदरभाई मावजो यांनी अचानक सुतळीबाँम्ब टाकून मराठी साहित्य वर्तुळात धावाधाव घडवली.