राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यात २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षापासून ‘आनंददायी शनिवार’ हा उपक्रम सुरू झाला आहे. त्याची रूपरेखा स्पष्ट करणारा लेख.
समाजपरिवर्तन, समाजाचा सर्वांगीण विकास, सामाजिक आनंद हे सगळे घडवण्याची प्रक्रिया कुठे किंवा कुठून घडते, तर त्याचे एकमेव साधन म्हणजे शिक्षण आहे. ‘शिक्षण हे माणूस घडवणारे असावे’, असे स्वामी विवेकानंद म्हणायचे. सध्या ‘घडवणे’ या प्रक्रियेत फक्त विद्यार्थ्यांना शालेय विषयात पारंगत करणे प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम संपवणे, परीक्षा घेणे व त्यामधून उत्तीर्ण-अनुत्तीर्ण ठरवणे एवढे मर्यादित स्वरूप आहे.