आरोग्य संवर्धक सूर्यनमस्कार

मकर संक्रांत, ता.14 जानेवारी रोजी सूर्य थोडासा उत्तरेकडे उगवेल- आणि देशभरात अनेक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि कृषी संदेश सोबत घेऊन येईल.
Suryanamaskar
Suryanamaskarsakal
Updated on
Summary

मकर संक्रांत, ता.14 जानेवारी रोजी सूर्य थोडासा उत्तरेकडे उगवेल- आणि देशभरात अनेक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि कृषी संदेश सोबत घेऊन येईल.

- सर्बानंद सोनोवाल

सूर्यनमस्काराच्या दैनंदिन सरावाने शरीराला लवचिकता, प्रतिकारशक्तीत सुधारणा, दिवसभर चैतन्य व उत्साह जाणवतो. आजच्या (ता.१४) सूर्यनमस्कार दिनानिमित्ताने...

मकर संक्रांत, ता.14 जानेवारी रोजी सूर्य थोडासा उत्तरेकडे उगवेल- आणि देशभरात अनेक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि कृषी संदेश सोबत घेऊन येईल. संक्रांत हा शब्द, संक्रमणकालीन हालचाल, उन्नतीची अंतर्बाहय स्पंदने, वैश्विक स्तरावरील आणि राशीचक्रातील संक्रमणे दर्शवतो. हे विश्वाचे मंथन आहे, प्रसंगाचे सौंदर्य आहे. हे मानवी शरीर-मन-चेतना आणि बाह्य जगामध्ये दोन्ही ठिकाणी परावर्तित करण्यासाठी- दोन्ही गोष्टी एकत्र व्हाव्यात याचे स्मरण करून देते.

सूर्यनमस्काराच्या माध्यमातून स्वतःला नवचैतन्य देण्याचा विशेष आणि प्रसंगनिष्ठ संदेश मानवतेपर्यंत पोहोचवण्यासाठी या निमित्ताचा उपयोग करून घेण्याचे आयुष मंत्रालयाने ठरवले आहे. योग साधना युगानुयुगे मानवतेची सेवा करत आहे; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतल्यापासून, योगाभ्यासाला जागतिक स्तरावर स्वीकृती मिळाली आहे. जी या प्रमाणात यापूर्वी कधीही मिळाली नव्हती. पंतप्रधान मोदी यांनी, सप्टेंबर 2014च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केलेल्या भाषणात, आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा करण्याचे आवाहन जागतिक समुदायाला केले. त्यांच्या आवाहनानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.

प्रतिकारशक्तीत सुधारणा

कोणत्याही प्रकारच्या आरोग्यविषयक समस्येचा सामना करण्यासाठी आपण आपल्या शरीर-मन-चेतनेला सुसज्ज करणे हे जगभरातील कोविड-19 संसर्गाच्या अलीकडील रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर आवश्‍यक आहे. जरी नियमितपणे सूर्यनमस्कार करणाऱ्यांची संख्या कमी असली तरी आपल्यापैकी बहुतेकांनी सूर्यनमस्काराबद्दल ऐकले असेल. योगासनांच्या या कृतीचे महत्त्व सूर्याला नमस्कार करण्यापलीकडे आहे.

मानवाच्या शारीरिक, मानसिक आणि अध्यात्मिक आरोग्यावर त्याचा खूप चांगला, खोलवर परिणाम होतो. सूर्यनमस्कार नियमितपणे योग्यरित्या केल्यास, आपली जीवनशक्ती आणि प्रतिकारशक्ती सुधारतेच, त्याचप्रमाणे सध्याच्या वेगवान आणि तणाव निर्माण करणाऱ्या जगात मानसिक संतुलन राखण्यास मदत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढाकारातून भारताच्या ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या अनुषंगाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आयुष मंत्रालयाने केवळ इतर मंत्रालये आणि राज्य सरकारांनाच यात सहभागी करून घेतलेले नाही,; तर जागतिक योग जगतातील सर्व प्रमुख हितसंबंधितांनाही या सामूहिक प्रात्यक्षिक कार्यक्रमात सहभागी केले आहे. योगाभ्यासाचे सार्वत्रिक आवाहन सूर्यनमस्कारात सामावलेले आहे. सूर्य हा सर्व सजीवांसाठी चैतन्य देणारा स्त्रोत आहे. सूर्यनमस्कार हे मानवासाठी कोणत्याही दुष्परिणामांशिवाय जीवनशक्ती देणारी खात्रीशीर मात्रा आहे. कोविड-19 संसर्गाच्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येवर मात करण्याच्या दृष्टीने, जीवनशक्ती आणि बळकट प्रतिकारशक्ती या सर्वात महत्त्वाच्या गरजा आहेत, याची जाणीव जगाला आहे. यामुळेच, सूर्यनमस्कार अधिक महत्वाचे आहेत. आम्ही या कार्यक्रमात केंद्रीय मंत्रालये, राज्य सरकारे आणि सर्व प्रमुख योग संस्था आणि योग गुरूंसह सर्व प्रमुख हितसंबंधितांना सहभागी करून घेतले आहे.

आमचा दृष्टीकोन केवळ एकाच कार्यक्रमांपुरता मर्यादित नाही, तर चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्यावर मंत्रालयाचा ठाम विश्वास आहे. आमच्या कृती धोरणांची रचना आणि अंमलबजावणी या दोन्हीमध्ये समन्वय आणि सातत्य निर्माण करण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे. 14 जानेवारीचा हा प्रात्यक्षिक कार्यक्रम देखील या सातत्याचाच भाग आहे. आणि मी हे हैदराबाद येथे देखील सांगितले होते जेव्हा, आम्ही अलीकडेच 75 कोटी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिके करण्याचा उपक्रम हाती घेतला होता.

मैत्री कायम ठेवावी!

सूर्यनमस्कार हे 12 चरणांमध्ये केलेल्या आठ आसनांचे संयोजन आहे. सर्व वयोगटातील लोक कोणत्याही अडचणींशिवाय ते करू शकतात. आरोग्यावर बाहेरून होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी या 12 चरणांचा नियमित सराव शरीराला पुरेशी लवचिकता देतो. मी येथे नियमित सूर्यनमस्कार केल्याने होणाऱ्या फायद्यांच्या तपशीलात जाणार नाही. फक्त आठवण करून देऊ इच्छितो की, माझ्याप्रमाणेच, सूर्यनमस्कार घालणारे दिवसभर उत्साही आणि एकंदर आरोग्यदायी अनुभव घेतात. यामुळे आरोग्याशी संबंधित समस्यांवरील वैयक्तिक आणि राष्ट्रीय खर्चाची मोठ्या प्रमाणात बचत होते. मला खात्री आहे की, ही मकर संक्रांत उर्जेची नैसर्गिक संसाधने तयार करण्याच्या जागतिक समुदायाच्या अभिनव संकल्पाची सुरुवात करेल. सूर्य आणि सूर्यनमस्कार आपले सर्वात चांगले आणि विश्वासार्ह मित्र असून, पुढील सर्व दिवस ही मैत्री कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. हे आपल्या सगळ्यांसाठी अधिकाधिक सहाय्यकारी ठरेल.

(लेखक केंद्रीय आयुष आणि बंदरे, जहाज व जलमार्ग मंत्री आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.