स्थळ : वरळीतील अज्ञात. वेळ : मध्यरात्र टळून गेल्यानंतरची.
कर्मवीर भाईसाहेब : (अंधाऱ्या खोलीत डोकावत) कुणी आलंय का?
फडणवीस नानासाहेब : (अंधारातून कुजबुजल्यागत) मी केव्हाच येऊन पोचलोय! या आतमध्ये!!
भाईसाहेब : (ऐसपैस स्थानापन्न होत) तुमचा निरोप येताक्षणी ठाण्याहून डायरेक्ट आलो! अजून लंच बाकीच आहे!!
नानासाहेब : (आवंढा गिळत) लंच?