स्थळ : अज्ञात. वेळ : ओढवलेली. पात्रे : त्रिदेव!
दादासाहेब : (दबकत प्रवेश करत) येऊ का? कोणी आलंय का हितं?
भाईसाहेब : (आधीपासूनच खुर्चीत येऊन बसलेले…) या की, तुमचीच वाट बघत होतो! झाली का राखी पौर्णिमा?
दादासाहेब : (हात दाखवत) जड झाला हात!
भाईसाहेब : (स्वत:चे दोन्ही हात दाखवत) मला तर दोन कमी पडले!!
दादासाहेब : (घाईघाईनं मुद्द्यावर येत) कशापायी आपली अर्जंट मीटिंग लावली कळेल का? मला यात्रा अर्धवट सोडून यावं लागलं!!