ढिंग टांग
आजची तिथी : क्रोधी नाम संवत्सर श्रीशके १९४६ कार्तिक कृ. द्वितीया.
आजचा वार : संडेवार (बहुधा) हल्ली सगळे वार सारखेच!
आजचा सुविचार : वो तो है अलबेला, हजारों में अकेला, सदा तुमने ऐब देखा, हुनर तो न देखा…!
नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत मी नाही, हे जाहीर केल्यानंतर सुटल्या सुटल्यासारखे वाटत आहे. एक मोठे ओझे उतरले. खूप दिवसांनी केशकर्तनाच्या दुकानात जाऊन डोईवरचे वाढलेले टोपले उतरवल्यावर जसे हलके वाटते, तसे वाटते आहे!!