ढिंग टांग - ‘सागर’ लाटांवरचा स्वार..!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सकाळी उठलोच नाही, याचे कारण रात्री झोपलोच नाही. दिवसरात्र जाग्रणे चालू आहेत. जागावाटपाच्या चर्चा, भेटीगाठी, उमेदवारांची यादी, यातच वेळ जातो आहे.
Election Preparations
Election Preparationssakal
Updated on

आजचा दिवस : विक्रम संवत आश्विन कृष्ण षष्ठी.

आजचा वार : ट्यूसडेवार

आजचा सुविचार : सागर किनारे, दिल ये पुकारे, तू जो नहीं तो मेरा, कोई नहीं है…!!

न मो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सकाळी उठलोच नाही, याचे कारण रात्री झोपलोच नाही. दिवसरात्र जाग्रणे चालू आहेत. जागावाटपाच्या चर्चा, भेटीगाठी, उमेदवारांची यादी, यातच वेळ जातो आहे. अर्थात, यावेळी फक्त तीनदाच वेषांतर करावे लागले. मागल्या खेपेला जवळजवळ रोज वेषांतर करावे लागल्यामुळे एखादा मेकपदादा फुलटाइम ठेवावा की काय, असा प्रश्न पडला होता. पण आता मी स्वत:च मेकप करायला शिकलो आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.