ढिंग टांग: देवाभाऊ, दाढीभाऊ आणि जाकिटभाऊ

दाढीभाऊ : (उल्लेखित हनुवटी खाजवत) रोज चार-पाच भाषणं करायची, म्हणजे जरा जास्त होतं…नाही का? जाकिटभाऊ : (गुलाबी स्मित करत) मग करु नका! कोण सांगतंय, भाषणं करा म्हणून! भाषण करावं की न करावं, हा लोकशाहीनं ज्याला त्याला दिलेला अधिकार आहे!
Vidhan Sabha Elections 2024
Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

ढिंग टांग

स्थळ : बहुधा कोल्हापूर असावे. वेळ : बहुधा दिवसा असावी!

पात्र : बहुधा तीन असावीत!!

दाढीभाऊ : (उल्लेखित हनुवटी खाजवत) रोज चार-पाच भाषणं करायची, म्हणजे जरा जास्त होतं…नाही का?

जाकिटभाऊ : (गुलाबी स्मित करत) मग करु नका! कोण सांगतंय, भाषणं करा म्हणून! भाषण करावं की न करावं, हा लोकशाहीनं ज्याला त्याला दिलेला अधिकार आहे!

देवाभाऊ : (हळहळत) तुम्हाला किती छान छान नावं मिळाली! दाढीभाऊ काय, जाकिटभाऊ काय…मलेच काही मिळून नै ऱ्हायलं!! देवाभाऊ हे काय नाव झालं? ते तर आमचा मीडिया सेलही वापरतो!!

दाढीभाऊ : (हनुवटी कुरवाळत) तुम्ही वाढवा दाढी, कोण नको म्हणतंय! दाढी वाढवलीत तर उद्या तुम्हालाही लोक दाढीभाऊ म्हणतील!!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.