ढिंग टांग: फूल और पत्थर!

dhing tang
dhing tangsakal media
Updated on

प्रति नाना-

जय महाराष्ट्र. गेले काही दिवस तुम्ही तोंडाचे डबडे वाजवत आहात, आम्हास नाही नाही ते बोल लावीत आहात. आम्ही एक्या कानांने एकोन दुज्या कानांनी बाहेर सोडोन देत आहो, हा भाग अलाहिदा. परंतु, आपली फुकाची बडबड किती फोल आहे, याचा ढळढळीत पुरावा सोबत पाठवत आहे. डोळियांस रांजणवाडी झालेली नसल्यास कृपया, हा पुरावा जरा वाचा!

आपले परमगुरु आणि आमचे थोरले बंधू मा. श्री. श्रीनमोजी यांनी आम्हांस जातीने दूरध्वनी करोन पाठ थोपटली. इतकेच नव्हे तर सध्याच्या आपत्काळात आम्ही अतुलनीय धैर्याचे प्रदर्शन करोन झुंजार वृत्तीने मस्तवाल विषाणूचे नाक ठेचत आहो, असे मानपत्रदेखील बहाल केले आहे. ही शिंची कोरोनाची मसलत संपली की आमचे समारंभपूर्वक ‘कोरोनेशन’ केले जाईल, असा शब्ददेखील त्यांनी दिला आहे. त्यांच्या मानपत्रातील काही ओळी अशा : ‘‘म्हारा प्रिय नान्हाभाई उधोजीभाई, तमे सतप्रतिसत प्रणाम अने जे श्री क्रष्ण. आजे हुं बहु प्राऊड फील करु छुं! तमने तो मारा नाम निकाळ्या. नान्हाभाई छो, एटले थेंक्यू बोलवामाटे जीभ ना वळे छे! (जीभ वळत नाही या अर्थी! सुज्ञांनी समजून घेणे!) तमे तो एक नंबर माणस छो! कोंग्रेच्युलेशन्स!! एमने एमज काम च्यालू ठेवा! बाकी कोणे पत्थरबाजी करणार तर तेच्याकडे लक्ष देऊ नका...आवजो. आपडा. नमोभाई.’’

वाचलेत? गेली डोळ्याची रांजणवाडी? आता भोगा फळे!! तुम्ही कितीही नावे ठेवलीत तरी माझे कामच पुरेसे बोलके आहे...गेले अनेक महिने मी पिछाडीवर राहून विषाणूविरुद्धची लढाई लढतो आहे. या लढाईत पिछाडी हीच आघाडी आहे, हे तुम्हाला कोण सांगणार? जाऊ दे. तुमचेच परमगुरु आमच्यावर आशीर्वादरुपी कमळपुष्पांचा वर्षाव करत असताना तुम्ही सुरु केलेल्या चिखलफेकीला आम्ही किंमत देत आहे. तुमचा नव्हे, संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका. उधोजी (मा. मु. म. रा.)

ता. क. : मास्क लावा, वारंवार हात धुवा आणि सुरक्षित अंतर पाळा. किंबहुना पाळाच

dhing tang
ढिंग टांग : हात जोडून विनंती!

प्रिय माजी मित्र मा. उधोजीसाहेब यांसी, शतप्रतिशत प्रणाम. तुमचे पत्र मिळाले. वाचून च्याटंच्याट पडलो. आमचे परमगुरु प्रात:स्मरणीय, परमप्रार्थनीय मा. श्रीश्री नमोजी (१०८वेळा वाचावे!) यांनी आपल्याला फोन केला व मानपत्रही पाठवले हे वाचून हादरलो. चौकशी केली असता असे काही पत्र पाठवलेच नसल्याचा खुलासा झाला. इतकेच नव्हे, तर आमच्या गुरुवर्यांनी तुम्हाला फोनच केला नव्हता, असेही निष्पन्न झाले आहे. तुम्ही पाठवलेले पत्र हे तुमच्या कोरोनाच्या आकडेवारीइतकेच खरे आहे, असे म्हणावे लागत आहे. आमचे कमळाध्यक्ष (राज्य शाखा) मा. चंदुदादा कोल्हापूरकर यांच्या कानावर हा प्रकार घातला. दिल्लीहून फोनवर आपले कौतुक करण्यात आले हे ऐकून ते चक्क फिक्कन हसले!! आणि म्हणाले, ‘‘द्या टाळी! तो फोन आपल्या भातखळकरांनी आवाज बदलून केला होतान म्हणे!!’’ आम्ही दोघेही मनमुराद हसलो. तेव्हा तुमचा फोनसुद्धा कोविड लसीसारखाच निघाला, असे म्हणावे लागणार! लस आली आली म्हणतात, पण येतेय कुठे?

आमचे वरिष्ठ तुम्हाला कमळपुष्पे वाहतात, आणि आम्ही (कमळाखालचा) चिखल उचलतो, असे तुम्हाला वाटत असेल तर त्याला आमचा इलाज नाही. भ्रमाचा भोपळा फुटून तुमचा करेक्ट कार्यक्रम (पक्षी : कोरोनेशन!) कधी ना कधी होईलच. कळावे. आपला नानासाहेब फ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.