स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे संस्थान.
वेळ : प्रात:काल. सुमारे साडेआठ.
राजाधिराज उधोजीमहाराज अत्यंत अस्वस्थपणे अंत:पुरात येरझारा घालीत आहेत. मधूनच मूठ उगारुन अदृश्य व्यक्तीच्या पोटात गुच्ची मारल्याचा आविर्भाव करीत आहेत. अदृश्य व्यक्तीचे पोट मोठे असणार, असा संशय घेण्यास जागा आहे! मधूनच कुण्या अदृश्य व्यक्तीची दाढी कचाकचा ओढल्याचीही ॲक्शनही ते करतात. ही अदृश्य व्यक्ती वेगळी असणार, वाटते. अब आगे…