ढिंग टांग
सदू : (फोन फिरवत) गुर्रर्र…गुर्रर्र…हिर्रर्रर्र..!
दादू : (आवाज ओळखून) सदूराया, तू कशाला वाघासारखी डरकाळी फोडतोस? तू इंजिनाची शिट्टी मार! कूऽऽक…अशी!
सदू : (काळजीपोटी) तुझ्या बॅगा तपासल्या म्हणे!
दादू : (खवळून) नतद्रष्ट, निमकहराम, गद्दार लेकाचे..!
सदू : (चौकशी करत) काय निघालं बॅगेत?