ढिंग टांग : भेटीगाठींचे रहस्य..!

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! आता आपली मराठी भाषा अभिजात झाली आहे की नाही?
Dhing Tang
Dhing Tangsakal
Updated on

सदू : (मुद्दाम फोन फिरवत) म्यांव म्यांव…गुर्रर्र!

दादू : (भडकून फोनमध्ये) सद्या, मांजराचे आवाज काढून वाघाला घाबरवतोस?

सदू : (खेळीमेळीने) गंमत केली रे! नंतर वेळ मिळणार नाही म्हणून आत्ताच दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला फोन केला!! हॅप्पी दिवाली!!

दादू : (चुकीची दुरुस्ती करत) अंहं! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!! आता आपली मराठी भाषा अभिजात झाली आहे की नाही?

सदू : (विषय बदलत) सध्या निवडणुकीची धामधूम असेल…नं?

दादू : (खांदे उडवत) छे! मी काही असली धावपळ करत नाही! आमचे दूत संजयाजी राऊत करतात!!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.