ढिंग टांग
बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅऽऽण..! मम्मा, आयॅम बॅक!
मम्मामॅडम : (पक्षकार्याची कागदपत्रे हातावेगळी करत) हं..!
बेटा : (डोक्यावरचे ओझे सांभाळत) जरा, हाथ लगाना, ये बोझ उतारने कू!
मम्मामॅडम : (डोक्यावर चौकोनी खोका बघून अचंब्यानं) हे कुठून घेऊन आलास?
बेटा : (हळूवारपणाने चौकोनी खोका उतरवत) आत्ताच मुंबईहून येतोय!
मम्मामॅडम : (आश्चर्यानं) मुंबईत खोके मिळतात, हे गेली दोन वर्षं ऐकून होते! पण घरी का आणलास?