ढिंग टांगबरे केले देवा । केले मतदार ।एवढा प्रचार । कोण करी?॥उन्हात तान्हात । फिरती हे येरु ।करिती प्रचारु । हिरीरीने ॥वचने अचूक । देईन अमूक ।करीन तमूक । तुमच्यासाठी ॥जीवन हे सारे । वाहियेले आहे ।लोकशाही पाहे । सारे थेर ॥.दावोनि बत्तिशी । हांसे तोंडभर ।तोचि उमेदवार । ओळखावा ॥शुभ्रसा पोशाख । जोडोनिया हात ।करी वास्तपुस्त । आर्जवाने ॥द्यावे मज एव्हा । तुमचे आशीर्वाद ।करु नका नाद । इतरांचा ॥आपुल्या क्षेत्राचा । मीच क्षेत्रपाल ।.बाकीचे हमाल । भारवाही ॥स्वच्छ कारभार । आणखी डोळस ।करीन विकास । तुम्हालागीं ॥करीन मी यंव । करीन मी त्यंव ।हाताला खवखव । माझ्यालागीं ॥राजकीय पक्ष । त्यांची वरकडी ।देती लोणकढी । पानोपानी ॥शेतकऱ्यां देऊ । पूर्ण कर्जमाफी ।नसे नाइन्साफी । आमुच्या लेखी ॥आयाबहिणींना । देऊ दरमहा ॥.दीड दोन दहा । सहस्त्र हो ॥मागाल ते देतो । अहो भाऊराव ।तेवढा चुनाव । करा पाहू ॥राजकीय पार्ट्या । देती आश्वासने ।फुकाची विमाने । उड्डाणली ॥कुणाचा पतंग । करी काटाकाटी ।त्यासी आटोकाटी । मते देऊ ॥किती वचननामे । निर्धार संकल्प ।.आश्वासने कल्प । उडविती ॥मतांच्या बाजारी । ठेले जागोजाग ।किती भागंभाग । मालासाठी ॥रेवड्या बत्तासे । लाह्या नि फुटाणे ।ऐसे ताणेबाणे । लोकशाहीचे ॥भाबडी जनता । घेतसे गा धाव ।फुटला का भाव । मतांचा हो? ॥इलेक्शनकाळी । थापांचा हंगाम ।.Maharashtra Vidhan Sabha: काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरुए? अधिकृत उमेदवाराला सोडून वरिष्ठ नेते करताहेत बंडखोरांचा प्रचार.भीषण संग्राम । थापाड्यांचा ॥कोण मारी बाता । लंब्या लंब्या फेकी ।तोचि गा बेरकी । बनेलबापू ॥आपुल्या बापाचे । असे काय जाते ।फेकलिया बाते । फेकावी ना ॥देऊ रोजगार । ज्यास हवा त्याला ।किंवा थोडे खर्चाला । पैकापाणी ॥कोणा हवे पाणी । कोणा हवे घर ।किंवा सिलिंडर । फुकाफुकी ॥नका भरु तुम्ही । हेचि वीज बिल ।दुखते हो दिल । हळवे माझे ॥पाहोनि आमुचे । तुटते काळीज ।रयतेची वज । कोण राखी? ॥प्रवास फुकट । घासही फुकट ।आयुष्य फुकट । फुकटची ॥देतसे गा तुम्हा । जो की खाटेवरी ।तोच तो हरी । मीची आहे ॥आमुच्या वचनांस । म्हणे जो रेवडी ।त्याचा डाव रडी । झाला झाला ॥पक्षाचा विकास । राज्याचा विकास ।देशाचा विकास । विश्वाचाही ॥विकासात आहे । तुमचा विकास ।आमुचा विकास । तेथ होई ॥जो की जे वांछिल । तो की ते लाहो ।ऐसा माझा टाहो । ऐकावा जी ॥ज्ञानोबारायाने । मागितले छान ।तेचि पसायदान । मॅनिफेस्टो ॥ऐसे गा मी ब्रह्म । देतो सहस्त्रहस्ते ।नि:शुल्क नि सस्ते । घ्यावे घ्यावे ॥मतदानदिनी । दाबा ते बटण ।तेथ हे वंगण । कामी येई ॥नंदी म्हणे हाचि । वंदूया महिमा ।लोकशाहीनामा । चिरायू हो ॥.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.