ढिंग टांग
एग्झिट पोल अर्थात मतदानोत्तर चाचणीस लोकशाहीच्या लोकोत्सवात अनन्यसाधारण महत्त्व आहे. जिथे लोकशाही नांदते, तिथेच एग्झिट पोल होते. किंबहुना, एग्झिट पोल आहे, म्हणून लोकशाही आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. (पण का म्हणता?) एग्झिट पोल यास अभिजात मराठी भाषेत नेमके काय म्हणतात, हे अजून (भल्याभल्यांना) समजू शकलेले नाही.-पण एग्झिट पोल असेच म्हणत असावेत!!