दादू : (खवचटपणाने फोन फिरवत) गुर्रर्रर…गुर्रर्रर्र…घ्र्यांऽऽव…!
सदू : (उलट चिडवत) म्यांव म्यांव...!
दादू : (ओठ आवळून) सद्या, पुरे झाला हा चहाटळपणा! मला चिडवतोस काय?
सदू : (गंभीर होत) जरा गंमत केली रे!! मनावर नको घेऊस!!
दादू : (रागारागाने) माझ्या गाडीच्या ताफ्यावर नारळ, टमाटे मारता? ही हिंमत? तुम्ही फेकलेल्या नारळाची चटणी करुन खाईन!!
सदू : (साळसूदपणे) कोणी फेकले नारळ? एवढी महागाई असताना?