अवकाशयानामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सुनीता विल्यम्स आणि बॅरी विल्मोर यांचा परतीचा प्रवास लांबलेला आहे. त्यांची आठ दिवसांची अवकाशातील मोहीम त्यामुळे आठ महिन्यांहून जास्त काळ लांबणार आहे. फेब्रुवारीत त्यांना परत आणण्याचे नियोजन असून त्यांच्या सुखरूप परत येण्याकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले आहे.
अनुभवी अंतराळ-वीरांगना म्हणून सुनीता विल्यम्स जगविख्यात आहेत. आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर ५ जून ते १३ जून दरम्यान प्रयाण करण्यासाठी सुनीताची आणि बॅरी विल्मोर या अंतराळयात्रींची निवड झाली. या मोहिमेचा एक महत्त्वाचा उद्देश होता; तो म्हणजे ‘बोईंग’ आणि ‘स्पेस एक्स’ या कंपन्यांनी तयार केलेल्या बोईंग स्टारलायनर यांच्या आधुनिक अवकाशयानाची चाचणी चाचणी घेणे.