- डॉ. अजित कानिटकर
सर्वच शासकीय धोरणाचे विषय आंतरविद्याशाखीय व जटील-किचकट-गुंतागुंतीचे होणार आहेत. वयाच्या पंचविशीत स्पर्धापरीक्षा देऊन सिद्ध केलेली बुद्धिमता तीस वर्षांनी केंद्रात सचिव झाल्यानंतरही तांत्रिक प्रश्न सोडवण्यासाठी समर्थ असेल हा भाबडा आशावाद ठरेल. काही तज्ज्ञ व त्यांना बरोबर घेणारे अधिकारी अशा जोड्यांची आता आवश्यकता आहे.
डॉ. वसंत गोवारीकर, डॉ. विजय केळकर, डॉ. रघुराम राजन, डॉ. मनमोहनसिंग, डॉ. विमल जालान, सॅम पित्रोदा ही नावे अनेकांना परिचयाची आहेत. यातील कोणीही केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) स्पर्धापरीक्षेत उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत गेले नाहीत. तरीही गेल्या वीस-तीस वर्षात, त्या त्या वेळेच्या केंद्र सरकारांमध्ये महत्त्वाच्या पदांवर या व्यक्तींनी अधिकारपदे भूषविली.