Success Story : भंगार गोळा करणारा रवी बनला उपशिक्षणाधिकारी!

प्रत्येकाच्याच आयुष्यात संघर्ष असतो. हा संघर्ष कधीच कुणाला चुकत नाही. अर्थात संघर्षाचे हे रुप प्रत्येकासाठी वेगवेगळे असते
success story scrap collector Ravi became Deputy Education Officer
success story scrap collector Ravi became Deputy Education Officersakal
Updated on

प्रत्येकाच्याच आयुष्यात संघर्ष असतो. हा संघर्ष कधीच कुणाला चुकत नाही. अर्थात संघर्षाचे हे रुप प्रत्येकासाठी वेगवेगळे असते. कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्याच वाट्याला ते येते. या संघर्षाशी चार हात करणारा पुढे जातो. तावून सुलाखून तोंड देणारा आयुष्याच्या रणावर यशस्वी ठरतो. रवींद्र सिद्धेश्वर खंदारे या व्यक्तीने आपल्या आयुष्यात पदोपदी असाच संघर्ष अनुभवला. याच संघर्षाला पुढे सामर्थ्यात बदलून टाकले.

- सुनील शेडगे, सातारा

हातगाडा घेऊन हमाली करणारे वडील अन् डोक्यावर वाळूची पाटी घेऊन बिगारीकाम करणारी आई आणि त्यांना हातभार लावताना कचरा, भंगार गोळा करणारा रवी हा त्यांचा मुलगा. एका संघर्षाच्या गोष्टीचा आरंभ झाला तो असा.

आईवडिलांच्या जीवघेण्या कष्टाच्या झळांनी या रवीचे अवघे आयुष्यच बदलून टाकले. शालेय जीवनातील हुशारीने त्याच्या आयुष्यात सामर्थ्य भरले. दहावी, बारावीत यश मिळवीत हा मुलगा एकेक पायऱ्या वर चढत राहिला. एकेकाळी शिक्षण ही बाब दुर्लभ असताना तो प्रसंगी मामाच्या घरी राहून शिकत राहिला. आज तोच मुलगा उपशिक्षणाधिकारी बनला आहे.

जिद्द माणसाला कुठून कुठे घेऊन जाते याचे हे प्रभावी, प्रेरणादायी अन् परिणामकारक उदाहरण. रवींद्र खंदारे यांनी अत्यंत प्रतिकूलतेत शिक्षण घेतले. सोलापूर जिल्ह्यातील जामगाव (ता. बार्शी) येथून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास.

वाटेवर पदोपदी येणाऱ्या अडथळ्यांना मागे टाकत त्यांनी डीएड पूर्ण केले. मग प्राथमिक शिक्षक, केंद्रप्रमुख, केंद्र समन्वयक, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी अशी त्यांच्या पदांची कमान कायम चढती राहिली. सध्या ते सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

दरम्यानच्या काळात राज्य अन् राष्ट्रीय स्तरावरील अभ्यासगटात त्यांनी प्रभावी कामगिरी बजाविली आहे. नवी दिल्लीतील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्थेमार्फत शैक्षणिक प्रशासनातील नवोपक्रमाबद्दल त्यांना राष्ट्रीय पारितोषिकानेही गौरविण्यात आले आहे. सेवाकाळातच त्यांनी बीएड, एमएडसारखे अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. एम.फिल, नेट, सेटसारख्या आव्हानात्मक परीक्षा ते उत्तीर्ण झाले. स्पर्धा परीक्षेतही ते यशस्वी ठरले आहेत.

‘संघर्ष हेच सामर्थ्य’

आपल्या या संघर्षमय आयुष्याचा पट रवींद्र खंदारे यांनी अलीकडेच शब्दबद्ध केला आहे. सध्या प्रकाशन व्यवसायात अग्रगण्य असलेल्या पुण्याच्या चपराक प्रकाशनाने तो प्रसिद्ध केला आहे. ’संघर्ष हेच सामर्थ्य' असे या आत्मकथनाचे नाव. उल्लेखनीय म्हणजे या पुस्तकाच्या केवळ तीन महिन्यात तीन आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. या पुस्तकात खंदारे यांनी आजवरच्या संघर्षमय वाटचालीच्या कहाणीचे कैक पैलू उलगडले आहेत. त्यांची ही जीवनगाथा वाचकांसाठी विलक्षण प्रेरणादायी ठरली आहे. लवकरच या पुस्तकाचा इंग्रजी भाषेतील अनुवाद प्रसिद्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.