अवघ्या ३७ वर्षांच्या पेतोंगतार्न शिनावात्रा यांची नुकतीच थायलंडच्या पंतप्रधानपदी निवड झाली. आतापर्यंत त्या थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान ठरल्या असून शिनावात्रा कुटुंबातून पंतप्रधान होणाऱ्या त्या तिसऱ्या व्यक्ती. शिनावात्रा कुटुंबाला थायलंडमध्ये मोठी प्रतिष्ठा आहे. पेतोंगतार्न यांचे वडील ठकसीन शिनावात्रा आणि त्यांची आत्या यिंगलुक शिनावात्रा यांनी थायलंडचे पंतप्रधानपद भूषविले आहे. ठकसीन अत्यंत लोकप्रिय होते; मात्र २००६ मध्ये त्यांच्याविरोधात लष्करी बंड होऊन ठकसीन यांना अज्ञातवासात जावे लागले.