- केदार गोरे
हत्ती या महाकाय प्राण्याबद्दल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कुतूहल वाटत आले आहे. मोठाले कान, लांब सोंड, प्रचंड सुळे, बलदंड पाय आणि तुलनेत लहान वाटावे असे डोळे, सारे काही इतर प्राण्यांपेक्षा खूप वेगळे व म्हणूनच उत्कंठा जागृत करणारे. हत्तीला भगवान श्रीगणेशाचा अवतार मानून त्याची पूजा केली जाते, तर दुसरीकडे जंगलाजवळ राहणारे अनेक लोक हत्तींकडे एक उपद्रवी प्राणी म्हणून पाहतात. आज (१२ ऑगस्ट रोजी) जागतिक हत्ती दिन साजरा होत आहे. त्याचे औचित्य साधून थोड्याश्या जमिनीवरील सर्वांत मोठ्या प्राण्याविषयी थोडेसे जाणून घेऊ या.