चरक संहितेने आयुर्वेदातील तीन प्रमुख संहितांमधील ‘एक वैद्य कसा असावा’ इथपासून ते ‘परिचारक रुग्ण कसा असावा’, याचे विस्तृत विवेचन केले आहे.
वैद्यक व्यवसाय (चिकित्सा) करण्यापूर्वी चरक आचार्यांची शपथ घेण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. हा आपले स्वत्व टिकविणारा हक्काचा निर्णय. पाच हजार वर्षांपूर्वी लिहिलेली आपल्याकडची शपथ सोडून आपली चिकित्सा पद्धती हिपोक्रिटसची शपथ घेत होते. आरोग्याहितासाठी टाकलेले हे योग्य पाऊल आहे.
चरक संहितेने आयुर्वेदातील तीन प्रमुख संहितांमधील ‘एक वैद्य कसा असावा’ इथपासून ते ‘परिचारक रुग्ण कसा असावा’, याचे विस्तृत विवेचन केले आहे. वैद्यावर कोणते संस्कार असावेत आणि वैद्याने आपला वैद्यकीय व्यवसाय करण्यापूर्वी कोणती समर्पण शपथ घ्यावी, या गोष्टींचा उल्लेख पाच हजार वर्षांपूर्वी करण्यात आला, हे विशेष. चरक हे भगवान धन्वंतरींचे शिष्य. चरक हे प्रथम शास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रतिकारक्षमता, पचनक्रिया आदी बाबींचे विवरण केले. चरक आचार्यांचा काळ साधारणपणे ख्रिस्तपूर्व ३०० हा होता. चरकाचार्यांनी सर्व संशोधने ‘चरक संहिता’ नावाने प्रसिद्ध केली. आजमितीस ह्या संहितेचे अनेक भाषांत रुपांतर झाले असून, इंग्रजी, रशियन, जर्मन, चिनी अशा भाषांचा त्यात समावेश आहे.
चरकाचार्यांनी आरोग्य व व्याधी हे पूर्वी ठरलेले नसतात, असा मुद्दा मांडला. आपल्याला पूर्णपणे रोगमुक्त आयुष्य जगता येते, हा आत्मविश्वास दिला. मनुष्याच्या प्रयत्नाने, ध्येयाने, एकाग्रतेने दीर्घ आयुष्य प्राप्त करता येते, हे स्पष्ट केले .आज संपूर्ण विश्व ह्याच अभ्यासातून आरोग्याची अनुभूती घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. सर्व व्याधींपासून रक्षण करता येते, व्याधी निर्माण झाल्यावर त्यावर चिकित्सा करण्यापेक्षा त्याचा मुळात प्रतिकार शरीरयंत्रणेने करून आरोग्य राखावे, हा महत्त्वाचा मुद्दा मांडला. हा मुद्दा कोविडच्या काळात सिद्ध झाला. हे सगळे लक्षात घेता शपथेच्या निमित्ताने चरक ऋषींचे स्मरण करणे ही चांगली बाब नव्हे काय? सर्व वैद्यांसाठी तयार केलेल्या शपथेच्या मसुद्यात त्यांनी चिकित्सा करणारा (वैद्य) हा किती पवित्र, निर्मळ असला पाहिजे, याचा उल्लेख आहे.
चरकाचार्यांची तयार केलेली ही शपथ चिकित्सक व रुग्ण ह्यातील नातं किती नाजूक असते आणि ते जपण्यासाठी कोणत्या मुद्यांचा विचार करावा, अवलंब करावा हे सांगणारी आहे. चरकाचार्यांनी धन्वंतरी प्रेरणेने अध्ययनच केले नाही, तर चिकित्सक रुग्ण हितासाठी मनाने वैद्य तयार करण्यासाठी प्रयत्न जाणीवपूर्वक केले. त्या भगवान धन्वंतरी आणि चरक ऋषींना प्रणाम. सर्व चिकित्सकांनी मग ते कोणत्याही शास्त्राचे असोत, त्यांचे ध्येय हे आरोग्य सेवा आहे, त्यांनी भगवान धन्वंतरीसमोर जाऊन ही शपथ घेऊन रुग्ण- चिकित्सक यांच्यातील नाळ दृढ करण्यासाठी प्रयत्न करावे, हेच यातून दिसून येते.
रुग्णहिताशी बांधील
‘दिवसरात्र मी शरीर, मन, आत्म्याच्या एकाग्रतेने रुग्णाच्या हिताचा विचार करण्यात मग्न राहीन. मी कोणत्याही प्रकारे रुग्णाला दुखावण्याचा प्रयत्न माझ्या लाभासाठी किंवा माझ्या वैभवासाठी करणार नाही. मी माझ्या व्यवसायाशी, चिकित्साशास्त्राशी प्रामाणिक राहीन. व्यभिचार करणार नाही. नीतिमूल्यांचे उल्लंघन करणार नाही. मी रुग्णसेवेत नम्रपणे कार्यरत राहीन. पापी माणसाच्या सानिध्यात, मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या सानिध्यात वा गुन्हा करणाऱ्यासोबत राहणार नाही. मी सातत्याने शुद्ध, निश्चित, खऱ्या, परिपूर्ण शब्दांचा, वाक्यांचा उच्चार करीन; ज्यायोगे प्रत्येकाला आनंद व ज्ञान प्राप्त होईल. माझी वर्तणूक नेहमी वेळ व काळाला ध्यानात घेऊन असेल. मी नेहमीच ज्ञानाच्या आधारे सर्वांचे उद्भोधन करीत राहीन.
(चरकसंहितेतील मजकुराचा स्वैर अनुवाद)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.