जवळपास सर्वच राज्यात सर्व राजकीय पक्षांनी महिलाकेंद्रित योजनांच्या घोषणा सुरु केल्या. महिला त्यामुळे केंद्रस्थानी आल्या. त्यांच्या भल्याचे राजकारण जसे सुरु झाले; तसेच त्यांच्या समस्यांचेही राजकारण सुरु झाले.
जगात कुठेही संघर्ष झाले की, पहिली शिकार ठरतात त्या महिला. चेहरे कल्पनेपेक्षाही अधिक विकृत असतात. हे आक्रमक स्त्रियांना भोगवस्तू म्हणून वापरतात, ओरबाडतात. ही मध्य़युगातील विकृती अद्याप नाहीशी झालेली नाही. राजकीय स्पर्धक शह-काटशहाच्या राजकारणात महिलांच्या विषयाचा आडून वापर करतात. छद्म युद्धासारखे हे आडून होणारे त्यामुळे भयावह. गेला आठवडाभर बदलापूरमधील घटनेच्या निमित्ताने हेच सुरु आहे.