वाळवंट म्हटलं की क्षितिजापर्यंत वाळू पसरलेली ओसाड भूरुपे डोळ्यासमोर येतात. पण रुक्ष दिसणारा हा प्रदेश पृथ्वीवर मात्र महत्त्वाचे कार्य करतो. वाळवंटाचे मुख्यतः दोन प्रकार आहेत. आफ्रिका, इस्राईल, ऑस्ट्रेलिया आणि भारतातील उष्ण आणि कोरडी वाळवंटे, आणि समशीतोष्ण प्रदेशाचे मंगोलियातील गोबी, भारतातील लडाख आणि चीनचे टकलामकानसारखे शीतवाळवंट.