- प्रसाद कुळकर्णी, kprasad 1959@gmail.com
१६ नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहनशीलता दिन म्हणून ओळखला जातो. असहनशीलतेचा अंत व्हावा हाच त्यामागचा उद्देश...
गेल्या एक-दोन दिवसांमध्येच व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर एक पोस्ट वाचनात आली. नेमकेपणाने टिप्पणी करणाऱ्या पोस्ट इथे अभावानेच आढळतात म्हणा... तर पोस्ट होती, ‘नाती सांभाळणं आजकाल थोडं कठीण होऊन बसलंय... कारण, संवाद फक्त मेसेजवर आणि वाद मात्र फोनवर. आता उरल्या भावना... त्या स्टेटसवर कळवल्या जातात...’