डॉ. आनंद नाडकर्णी
छत्रपती संभाजीनगरमध्ये अलीकडेच अडीच दिवसांच्या कालावधीमध्ये, सात जाहीर कार्यक्रमांचा गुच्छ सुगंधित करायचा होता. तिथे राहणारा माझा विद्यार्थी डॉ. आशिष (मोहिदे) आणि त्याची पत्नी गौरी ह्यांच्या घरी उतरलो होतो. सहा वर्षाचा त्यांचा मुलगा विहान माझ्या भोवती घोटाळत गप्पा मारत असायचा. रात्री मी झोपायला आलो की तो खोलीत यायचा. ‘‘आबा, तुला काही लागले तर मला उठव हं...’’ असं सांगून गुडनाइट करायचा. ‘‘तू सारखी सारखी इतकी सेशन्स कशाला घेत असतोस?’’ शेवटच्या दिवशी त्याची नाराजी व्यक्त झाली.