दुनियादारी : प्रेमाचं चित्र, थोडं विचित्र

‘हॅलो, एक्सक्यूज मी! हाय... आम्ही ना इथे एक छान पेंटिंगचा वर्कशॉप घेतो आहोत. फ्री आहे. तुम्हाला जॉईन करायला आवडेल?’
Drawing
DrawingSakal
Updated on
Summary

‘हॅलो, एक्सक्यूज मी! हाय... आम्ही ना इथे एक छान पेंटिंगचा वर्कशॉप घेतो आहोत. फ्री आहे. तुम्हाला जॉईन करायला आवडेल?’

‘हॅलो, एक्सक्यूज मी! हाय... आम्ही ना इथे एक छान पेंटिंगचा वर्कशॉप घेतो आहोत. फ्री आहे. तुम्हाला जॉईन करायला आवडेल?’

एका जानेवारीच्या उतरत्या दुपारी, निवांत झाडाखाली थाटलेल्या एका सुंदर कॅफेमध्ये एक मुलगी खूप छान स्वरात तिथल्या काही ग्राहकांना आग्रहाने हे विचारात होती.

‘अम्म... मला ना, ॲक्चुअली इतकं येत नाही चित्र वगैरे! अनेक वर्षात केली नाही मी चित्रकला!’ सार्थक त्याचा फोन बाजूला ठेऊन पास्त्याचा शेवटचा घास घेता घेता म्हणाला, ‘‘काहीच हरकत नाही अहो, इथं सगळे तुमच्यासारखेच आहेत!’’

‘म्हणजे सगळेच रेघोट्या मारणारे अनाडी?’

ती मुलगी हे ऐकून खुद्कन हसली, ‘म्हणायला हरकत नाही. बघा येत असाल तर डू जॉईन अस,’ असं म्हणून ती पुढं गेली.

सार्थकनं पास्ता छान चाटून पुसून खाल्ला, मग नॅपकिन्सनं हात तोंड पुसलं आणि मग ‘मला काहीच इंटरेस्ट नाहीये, पण इतकं तू बोलावलंस म्हणून आलोय,’ असे हावभाव घेऊन तो त्या वर्कशॉपमध्ये आला. त्या मुलीनं त्याला पाहताच ‘आलात? रेघोट्या स्पेशालिस्ट!’ ह्या एक्सप्रेशननं एक स्माईल दिली आणि त्याच्या हातात एक छोटा कॅनव्हास आणि पेन्सिल दिली. सार्थकसुद्धा छान हसला आणि त्यानं काहीही न बोलता ते हातात घेतलं आणि इतर समोर बसलेल्या लोकांमध्ये तो जाऊन बसला.

‘सगळ्यात जास्त ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो ना, ती गोष्ट मनापासून होते. तुमच्यापैकी अनेकांनी ह्याआधी कदाचित शेवटचा हातात ब्रश शाळेत असताना उचलला होता, आणि शेवटचं चित्र कदाचित दोन डोंगर, मध्ये सूर्य आणि वाहणारी नदी असं काढलं होतं... बरोबर?’ ती मुलगी सगळ्यांकडं छान बघून विचारते. समोर बसलेले ते १५-२० जण हसतात, सार्थकही हसतो.

‘‘तर आज कदाचित तुम्हाला परत असं बसून चित्र काढणं फार ऑड आणि बालिश वाटत असेल. वाटू दे! हरकत नाही... पण आज तुम्हाला हा तुमच्यासाठीचा क्षण मिळत आहेत, जो फक्त तुमचा आहे. जी गोष्ट येत नाही, त्यात प्रेम शोधलं की ती चांगली नाही झाली तरी समाधान मिळतं. तेच समाधान शोधुयात. चला, विचार करा तुम्हाला सगळ्यात जास्तं काय आवडतं ते आणि उतरवा कागदावर,’’ तिनं पुढं सगळ्यांना आवाहन केलं.

‘हहं... ‘तारे जमींपर’चा क्लायमॅक्स सीन.’’ सार्थक ते ऐकून मनातल्या मनात पुटपुटला.

सगळेजण चित्र काढायला लागले. ती मुलगी सुद्धा त्या कॅफेमधल्या एका प्लॅटफॉर्मवर मोठा कॅनव्हास लावून चित्र काढायला लागली. सार्थकनं खूप विचार केला की आपण कशावर नक्की प्रेम करतो ज्याचे चित्र काढता येईल. ऊन आता पूर्ण उतरलं होतं. तासाभराने सार्थकचं चित्र पूर्ण झालं आणि तो त्याच्याकडं कौतुकानं बघतच होता की तेवढ्यात ओळखीचा तो आवाज आला.

‘हे माझं चित्र आहे ना?’

सार्थकनं पटकन मान वळवून तिला शेजारी उभं पाहिलं.

‘अम्म... हो!’

‘तुला मी आवडतो? माझ्यावर कसं काय तू प्रेम करू शकतोस? आपण ओळखताही नाही एकमेकांना!’

‘अगं ते असंच... म्हणजे काही सुचत नव्हतं ना, मग जे समोर दिसलं ते काढलं.’

‘अच्छा असं होय... छान काढलं आहेत पण तुम्ही. रेघोट्या नाही मारल्या नुसत्या!’

सार्थक तिच्याकडं बघून छान हसला. ती पण हसली आणि पुढं निघून गेली. सार्थकनं त्या चित्राच्या कागदाची छान घडी घातली आणि मग नीट त्याच्या बॅगेतल्या एका फाईलमध्ये ठेवून दिली. तिचा ॲक्सिडेंट होऊन तिने त्याला पूर्णपणे विसरण्याआधीच्या सर्व इतर आठवणींसोबत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()