दुनियादारी : दुख्खट आत्मा

‘माझी ना सगळी तयारी झाली आहे. तू ये उद्या वेळेत. उगाच जास्त काम करत बसू नकोस ऑफिसमध्ये. सगळं मी नीट प्लॅन केलंय. पहिले एक छान वॉक घेऊ.
Soul soul
Soul soulSakal
Updated on
Summary

‘माझी ना सगळी तयारी झाली आहे. तू ये उद्या वेळेत. उगाच जास्त काम करत बसू नकोस ऑफिसमध्ये. सगळं मी नीट प्लॅन केलंय. पहिले एक छान वॉक घेऊ.

‘माझी ना सगळी तयारी झाली आहे. तू ये उद्या वेळेत. उगाच जास्त काम करत बसू नकोस ऑफिसमध्ये. सगळं मी नीट प्लॅन केलंय. पहिले एक छान वॉक घेऊ. मग खायला जाऊ आणि मग आइस्क्रीम...’’ प्रचंड एक्सायटेड कैवल्य श्रावणीला दिवसभरात तिसऱ्यांदा हे म्हणाला.

‘मला... मला नाही जमणारे हे सगळं!’ हलकी मान खाली घालून थांबलेली आणि कैवल्यपेक्षा अनेक पटीने कमी एक्सायटेड असलेली श्रावणी, एका अर्धवट दबक्या आवाजात म्हणाली.

‘काय नाही जमणारे?’ कैवल्यनं त्याला काहीतरी माहीत असल्याच्या स्वरात शांतपणे तिला विचारलं.

‘हेच सगळं मला नाही जमणारे! मला नाही झेपणार हे नातं. नाही झेपणार परत कोणाच्यात इतकं गुंतून जाणं.’

‘ह्म... आणि का असं सगळं वाटतंय तुला?' नात्यातील नावीन्यता सांभाळायच्या प्रयत्नात असलेला कैवल्यनं तिच्या डोळ्यात डोळे घालून अलगद विचारलं.

‘माहीत नाही. पण वाटतंय. म्हणजे मला तू आवडतोस. मला आपलं असणं सुद्धा आवडतं. पण ह्या सगळ्याचं प्रेशर वाटतं. मला माहितीये तू चांगला आहेस, पण माझ्या आधीच्या नात्यातल्या एक्सपिरियन्सचं ओझं जाणवत राहतं.’

‘अगं काय तू ना... तुला तर नसती ओझी डोक्यावरून वाहून न्यायची घाणेरडी सवयच आहे बघ! तुझ्या ब्रेकअपला ३-४ वर्ष झाली ना? आता किती दिवस अजून कुरवाळणारेस ते सगळं?’

‘खरंय, कळतंय मला. म्हणूनच मी तुला हो म्हणाले. ऑफकोर्स तू आहेस स्पेशल. तू वेगळं आनंदी जग दाखवतोस मला. पण, अरे ती मध्ये ३-४ वर्ष ह्या सगळ्याचा तिरस्कार करण्यात आणि स्वतःला प्रेमाची आयुष्यात गरज नाहीये हे समजावण्यात गेली. आता पुन्हा प्रेम करणं अवघड वाटतंय!’

‘पण हे सगळं तुला तुझंच कळतंय ना... की तिरस्कार करायची काही गरज नाहीये.’

‘कळतंय रे, पण वळत नाहीये! आणि ह्या सगळ्यात मला तुला हर्ट करायचं नाहीये. मला खूप हेवी वाटतंय हे सगळं तुला सांगताना पण मला नीट आनंदीसुद्धा राहता येत नाहीये ह्या सगळ्यात.’

नकळत गालावरून ओघळणाऱ्या तिच्या गालावरच्या अश्रूंना कैवल्य त्याच्या बोटानी पुसतो आणि खुदकन हसतो.

‘तू हसतोय काय? मी खूप तळमळीने सांगतीये तुला!’ रडवेल्या आवाजात कैवल्यचा हात बाजूला करत श्रावणी म्हणाली.

‘हसू नाही तर काय करू मी? तू असली दुख्खट आत्मा आहेस ना, की तुला आनंदाच्या क्षणी सुद्धा ‘इतका आनंद मला परवडणार का?’ ह्या चिंतेत जास्त दुःख होतं. आता तू दुःखाला इतकी स्पेस दिली आहेस आयुष्यात की तोच तुझा नवा बॉयफ्रेंड किंवा सोलमेट झालाय. करून टाक तू त्याचाशीच लग्न.’’ कैवल्य हसत म्हणाला.

श्रावणीनं रडता रडता त्याला फटका मारला आणि अजून डोळे गाळून ती रडायला लागली.

‘मी इथं आपल्या नात्याबद्दल इतकं टोकाचं काहीतरी बोलून अजून गिल्ट घेतीये आणि तुला गंमत सुचती आहे?’ ती हुंदके देत म्हणाली.

‘काय करू मग? तू एकतर ना आयुष्यातल्या सगळ्या चुका, सगळी दुःखं, चुका आणि दुःखं म्हणूनच लक्षात ठेवतेस. त्या एक अपॉर्च्युनिटी म्हणून लक्षात नाही ठेवत.’

‘काय बोलतोय?’

‘अगं तू जरका त्या चुका केल्या नसत्यास, ते दुःखं अनुभवलं नसतंस तर तुला काय बरोबर आहे हे कळालं नसतं. चूक चूक नसते, ती पुढच्या सुंदर रस्त्याला लागायचे एक अवघड वळण असते फक्त. तुझा आनंद कशात हे तुला आता कळतंय, कारण तू ते दुःख सोसलंस. म्हणून आता तर तुला माझ्यासारख्या वात्रट मुलामध्ये सुद्धा चांगल्या क्वालिटिज दिसायला लागल्यात बघ!’’ कैवल्य एक छान स्माईल देऊन म्हणाला.

श्रावणी हसते, मग डोळे पुसते आणि म्हणते, ‘‘इतका कसा रे तू समजूतदार?’

‘पण खरंच तू अजूनही दुःखाशी लग्न करू शकतेस बरंका. कसली भारी पाटी असेल - ‘श्रावणी वेड्स दुःख! ह्या दुःखद सोहोळ्याला नक्की नक्की यायचं हां!’

हे वाक्य म्हणता म्हणताच कैवल्यला अजून एक सटका बसला. काही दुःख एका पॉईंटनंतर सेलिब्रेट करता अली पाहिजेत फक्त!

mahajanadi333@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.