दुनियादारी : निव्वळ खोटारडे!

‘इथे तर मुलांच्या शॉपिंगसाठी एकही दुकान दिसत नाहीये रे!’’ ८-१० स्टॉल बघून झाल्यावर कस्तुरी अभयला म्हणाली.
Shopping
Shoppingesakal
Updated on
Summary

‘इथे तर मुलांच्या शॉपिंगसाठी एकही दुकान दिसत नाहीये रे!’’ ८-१० स्टॉल बघून झाल्यावर कस्तुरी अभयला म्हणाली.

‘इथे तर मुलांच्या शॉपिंगसाठी एकही दुकान दिसत नाहीये रे!’’ ८-१० स्टॉल बघून झाल्यावर कस्तुरी अभयला म्हणाली.

'तुला काय वाटतं? मला हे माहीत नव्हतं?"

"म्हणजे?? अरे तुला कुर्ता घ्यायचा म्हणून तू आणलंस ना मला इथे?"

"छान खोटं बोलतो ना मी?" अभयनं मिस्कील हसत विचारलं.

"हां? काय??" कस्तुरी फूल कन्फ्युजनमध्ये त्याला विचारते.

"अगं तुझंही दिवाळीचं शॉपिंग राहिलं होतं आणि मी सुद्धा कधीपासून तुझ्या मागे लागलोय की चल एकदा मला तुझ्यासोबत शॉपिंग करायचंय... मला तुझ्यासाठी काहीतरी घ्यायचं होतं, पण तुम्हाला कुठं हो वेळ? मग म्हटलं चला माझ्या नावानं तुला ओढत नेऊ... म्हणून हा सगळा घाट!"

कस्तुरीनं छान हसत पण तरी तिला नाही इतकं हे पटलं असं नाटक करून, "खोटारडा कुठला!" असे उद्गार अभयला दिलं.

"करना पड़ता है मॅडम...!" अभय पण उद्गारला.

ते दोघंही ऑफिसनंतरच्या दमलेल्या अवतारातही पहिल्यांदा एकत्र शॉपिंगला आल्याची एक वेगळी गोड ओढ घेऊन प्रदर्शनात फिरत होते. कस्तुरीला ऑलमोस्ट सगळ्याच स्टॉलवर काही ना काही आवडत होतं. अभय तिचं शॉपिंगचं आणि बार्गेनिंगचं प्रेम खूप जवळून आणि खूप प्रेमानं ऑबझर्व्ह करत होता. त्यात तिचंसारखं अधून-मधून ‘मी आत्ताच शॉपिंग केलंय, मला काही नाही घ्यायचंय...’ असं म्हणणं आणि मग लगेच पुढच्या स्टॉलवर जाताच ‘हे माझ्यावर कसं दिसतंय? अभय मी हे घेऊ का?’ हे प्रश्न तिनं नकळत विचारणं हे सगळं अभयला स्पेशल आनंद देत होतं.

खूप स्टॉल फिरल्यानंतर आणि भरपूर छोट्या मोठ्या गोष्टी घेतल्यानंतर मुलींच्या कपड्यांचे स्टॉल एका मागून एक दिसायला लागले. ‘‘अब आयेगा असली मजा!’’ असं अभयच्या डोक्यात लगेच आलं. कस्तुरीला काय बघू काय नाही आणि किती घेऊ किती नाही असं व्हायला लागलं.

"चांगलं दिसतंय का रे?"

"एकदम मस्तं!"

"कुठला रंग छान वाटेल?"

"गुलाबी छान आहे, मरून पण छान आहे, तो हिरवट पिवळा पण फ्रेश आहे..."

"अरे, तू कन्फ्युज करू नको, एकच घेणारे मी... बजेट नाहीये माझं एकतर!"

"असं होणं पॉसिबल आहे का, की तू फक्त एकच घेणारेस? पुढे बघ अजून किती स्टॉल आहेत..."

"अरे तू मला आत्ताच घाबरवून सोडू नकोस!"

"बरं ठीके, हा मरून घे... हा रंग नाहीये तुझ्याकडे."

कस्तुरी फिटिंग वगैरे सगळं नीट बघते आणि अभयनं सिलेक्ट केलेला रंग फायनल करते. ती हे सगळं करत असतानाच अभय त्याचा मोबाईल काढून ऑनलाइन पेमेंट करायला लागतो.

"अरे माझा ड्रेस आहे, मी देते!"

ते दोघं तिथेच सगळ्यांसमोर कोण पेमेंट करणार ह्यावरून गोंडस भांडायला लागतात.

"हे बघ मी तुला प्रॉमिस केलं होतं की मी तुला एक ड्रेस घेऊन देणार तर मला ते प्रॉमिस पाळू दे!"

"अरे, पण तू दुसरं काहीतरी साधं घे. हे खूप जास्त आहे."

"हे बघ मला तुझ्यासाठी असंच काही पण नाही घ्यायचंय. सो हे घेऊ दे. सगळे बघतायत तुझ्याकडं हट्टी मुलगी!" असं म्हणत अभय पेमेंट करतो. त्या स्टॉलवाल्या काकू गोड हसत तो ड्रेस पॅक करून कस्तुरीला देतात.

कस्तुरी थोडी लाजत ते घेते आणि मग दोन पावलं पुढे चालणाऱ्या अभयचा हात घट्ट येऊन धरते. मग त्याच्या कानापाशी जाऊन ‘थँक्यू, थँक्यू, थँक्यू...’ असं दबक्या आवाजात म्हणते. अभय तिनं धरलेला हात अजून घट्ट धरतो आणि छान स्माईल देतो.

ते पुढच्या स्टॉलवर जाता कस्तुरी तिला अजून काही नकोय ह्या आविर्भावात फिरत असते.

"तुला खरंच अजून काही घ्यायचं नाहीये? ते पुढं बघ वनपिस आणि मुलींच्या कुर्ती किती छान आहेत."

"नाही रे... काही नको अजून मला."

"चल! खोटारडी कुठली! जा सिमरन जा, करले अपनी ज्यादा की खरेदी!"

अभयनं घट्ट धरलेला कस्तुरीचा हात तो सोडतो आणि मिस्कील हसत म्हणतो.

"छान खोटं बोलते ना मी?"

कस्तुरीला पण हसू आवरत नाही.

त्यांचे कपडे मॅचिंग नव्हते, पण मनं, गोंडस खोटारडेपणा आणि एकमेकांसाठीची ओढ मात्र मस्त मॅच झाली होती.

mahajanadi333@gmail.com

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.