- पूनम शर्मा, editor@globalstratview.com
त्या दिवशी ‘व्हाइट हाऊस’च्या जवळ नेहमीची वर्दळ नव्हती. तो बुधवार खूपच विचित्र होता. अर्थात, सर्वात शक्तिमान आणि प्रभावी लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या निवडणुकीनंतरचा तो दिवस होता. हे साहजिकच होते, कारण या निवडणुकीनंतर जगाची गणिते बदलणार आहेत.