- डॉ. मालिनी नायर, nairmalini2013@gmail.com
अमेरिकेचे पुढील अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी जोरदार पुनरागमन केले आहे. मात्र, युरोपमधील व्यावसायिक समुदायासाठी ते निराश करणारे आहे. ट्रम्प यांच्या पुनरागमनामुळे युरोपमधील महत्त्वपूर्ण बाबींमध्ये मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची संभावना आहे. त्या राजकीय घडामोडीचे अनेक क्षेत्रांना कमी-जास्त प्रमाणात परिणाम भोगावे लागणार आहेत.