अमेरिकेच्या मागच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प हरले तेव्हा त्यांचा पराभव म्हणजे ट्रम्पवादाचा पराभव नव्हता. अमेरिकेतलं प्रचलित राजकारणच बदलून टाकणारा हा प्रवाह तेव्हाही बळकट होता. त्याचं प्रत्यंतर ट्रम्प यांनी या निवडणुकीत मिळवलेल्या दणदणीत यशानं आलं. तेव्हा पराभव मानायला तयार न झालेले ट्रम्प यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी ‘कॅपिटॉल हिल’वर केलला राडा हा अमेरिकेच्या इतिहासातला काळा अध्याय होता.