सर्व माणसांना समान मानणारा आणि विधात्यानंच त्यांना जन्मतः दिलेल्या काही अधिकारांवर शिक्कामोर्तब करणारा बहुचर्चित अमेरिकी स्वातंत्र्याचा जाहीरनामा ४ जुलै १७७६ रोजी प्रसिद्ध झाला, त्यानंतर अमेरिकेचा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदय झाला. या जाहीरनाम्यानं माणसाचं माणूसपण मान्य केलं खरं पण कृष्णवर्णीयांना मात्र परिघाबाहेर ठेवलं होतं.