-अॅड. निखिल संजय रेखा
लिंडसे परेरा यांचे ‘द मेमवार्झ ऑफ वाल्मिकी राव’ हे पुस्तक वाचून खाली ठेवल्यापासून वरील दोन अवतरणे माझ्या मनात रेंगाळतच राहिली. खरं सांगायचं तर मुखपृष्ट पाहून आणि ब्लर्ब वाचूनच मी या कादंबरीकडं आकृष्ट झालो होतो. त्यामुळं लगेच मी ती वाचायला घेतली. परंतु ती वाचून झाल्यानंतर मात्र तीव्र इच्छा होत असूनही तिच्यासंबंधी व्यक्त व्हावं, काही विवरण करावं असा आशयच माझ्या मनात जुळून येत नव्हता. मी जणू सुन्न झालो होतो.