आपण आसपास बऱ्याचवेळा आत्मविश्वास नसलेल्या, जबाबदारी टाळणाऱ्या, सतत कुणाचीतरी मदत मागणाऱ्या, कधी कधी अगदी नेभळट वाटाव्या अशा व्यक्ती पाहतो. त्या सतत कसल्यातरी तणावाखाली असतात, असं वाटत राहतं. अशा व्यक्ती हुशार असूनही सगळ्यात मागं राहतात.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सारख्या घाबरून असतात. आत्मविश्वास अजिबात नसतो. सगळ्यांची मर्जी राखण्याचा सारखा प्रयत्न करतात. गरज नसताना सगळ्या साहेबांच्या पुढे लाचारासारख्या वावरतात. त्यांच्या घरचीसुद्धा अक्षरशः: वाट्टेल ती कामं करतात. साहेबही त्यांना कसंही वापरून घेतात. हे सगळं त्या करतात कुठल्यातरी भीतीपोटी, दबावाखाली! ऑफिसचं रोजचं काम करतानासुद्धा सगळ्यांना ‘‘बरोबर आहे ना’’ विचारत राहतात. एकही निर्णय स्वत:च्या जबाबदारीवर घेत नाहीत.
चेहेऱ्यावर सहज लक्षात यावी अशी लाचारी दिसते, तर कधी उसनं अवसान किंवा उत्साह दाखवण्याचा प्रयत्न दिसतो. त्यांचं एकूणच वागणं बऱ्याचदा अस्वस्थ, भीतीच्या छायेखाली असल्यासारखं, कधी चंचल जाणवू शकतं. कौशल्य असूनही या व्यक्ती आयुष्यात विशेष काही करू शकत नाहीत. अशा व्यक्ती Dependent Personality Disorderच्या शिकार असू शकतात.
DPD हा एक DSM (Diagnostic Statistical Manual of Mental Disorders)च्या cluster C खाली वर्गीकरण केलेला Personality Disorders मधला प्रकार आहे.
याची सुरुवात साधारण कुमार वयातच होते. या व्यक्तींना स्वत:ला आतून खूप त्रास होत असतो. हा आजार स्त्री किंवा पुरुष, दोघांमध्येही असू शकतो. याची साधारण लक्षणे पुढीलप्रमाणे -
१. इतरांकडून सल्ला किंवा मदत घेतल्याशिवाय दैनंदिन जीवनातले सोपे निर्णयसुद्धा घेता येत नाहीत.
२. आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या निर्णयांची जबाबदारी इतरांनी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा केली जाते. किंबहुना इतरांचं ते कर्तव्यच आहे, अशी भावना असते.
३. इतरांशी मतभेद झाल्यास ते व्यक्त करायला भीती वाटते. कारण हेच की त्यामुळे त्या व्यक्ती दुखावल्या जातील आणि आपण त्यांचा आधार गमावून बसू.
४. स्वत: पुढाकार घेऊन नवीन काहीतरी करायला भीती वाटते, कारण आत्मविश्वासाची कमतरता आणि अपयशाची भीती.
५. इतरांची सहानुभूती किंवा पाठिंबा मिळत राहावा यासाठी वाट्टेल ते करण्याची प्रवृत्ती असते. त्यात करू नयेत, अशाही गोष्टी इतरांसाठी ते करतात.
६. एकटेपणाची, एकटं राहण्याची प्रचंड भीती वाटत असते. कारण स्वत: स्वत:ची जबाबदारी घेऊ शकू असा विश्वासच नसतो.
७. एखादं नातं तुटलं तर सहानुभूतीसाठी ताबडतोब नवीन नाती जोडण्याची घाई असते.
८. सतत अनामिक दडपण किंवा काल्पनिक भीतीच्या छायेखाली अशा व्यक्ती वावरतात.
याचं निदान फक्त तज्ज्ञच करू शकतात.
याची कारणं - बहुतांशी मेंदूतील रासायनिक असंतुलन, आनुवंशिकता, आयुष्यात लहानपणी किंवा नंतर घडून गेलेले असुरक्षितता निर्माण करणारे प्रसंग, लहानपणी न मिळालेला आवश्यक असा भावनिक आधार, तसंच लहानपणातील भावनिक असुरक्षितता आणि त्याच्याकडे झालेलं दुर्लक्ष. मुळातच लहानपणापासून व्यक्तिमत्त्वाची, मेंटल मेकअपची नीट न झालेली जडणघडण.
उपचार - औषधांइतकीच psychotherapyची गरज असते. बऱ्याचदा मनोकायिक psycho-somatic आजारांबरोबर, किंवा Anxiety Disorders, depression, किंवा मूड disorder सारख्या आजारांबरोबर हा आजार असू शकतो. त्यामुळे इतर लक्षणेही लक्षात घ्यावी लागतात. लहानपणातली किंवा नंतरची भीती, असुरक्षिततेची भावना यावर उपचार करायला लागतात. काल्पनिक भीती घालवावी लागते. आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन कसा मिळवायचा याचं प्रशिक्षण द्यावं लागतं.
सीबीटी, आरइबीटी, exposure थेरपी, systematic desensitization म्हणजे नियोजनपूर्वक भीतीवर मात करणे. वर्तमान क्षणात आनंदात, आत्मविश्वासानं राहण्याच्या तंत्रांचा, relaxation थेरपीचा उपयोग होतो.
माइंडफुलनेस कॉग्निटीव्ह बिहेवीअरल थेरपी (MBCT)चाही चांगला उपयोग होतो. योग्य मार्गदर्शन, उपचार आणि स्व-मदत याद्वारे अशा व्यक्तींमध्ये सुधारणा होऊ शकते. आपल्या जबाबदाऱ्या आपणच पार पाडल्या पाहिजेत. भावनात्मकदृष्ट्या स्वयंनिर्भर बनलं पाहिजे. आपल्या निर्णयांचे बरे-वाईट परिणाम झेलण्याची क्षमता आपल्यात असलीच पाहिजे. धडाडीनं पुढाकार घेऊन आयुष्यात काही गोष्टी केल्याच पाहिजेत.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.