#MokaleVha : कायद्याच्या चष्म्यातून 'लिव्ह इन'

Leave-In-Relation
Leave-In-Relation
Updated on

‘लिव्ह इन रिलेशनशिप’बद्दल आपण जाणून घेतले आहेच. आता आपण याबाबतच्या कायदेशीर तरतुदी काय आहेत ते बघू. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ची व्याख्या आपण सोप्या भाषेत समजावून घेऊ. 

‘आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे.’ 
त्यातही अशा प्रकारच्या संबंधात किंवा नात्यात येणारी मंडळी खालीलप्रमाणे - 

एकाच छताखाली राहणारी २ माणसे
१. प्रौढ पुरुष आणि अविवाहित महिला. 
२. विवाहित पुरुष आणि प्रौढ अविवाहित महिला. 
३. प्रौढ अविवाहित पुरुष आणि लग्न झालेली स्त्री. 
४. अविवाहित प्रौढ महिला आणि विवाहित पुरुष. 
५. २ समलिंगी व्यक्ती (पुरष/अथवा स्त्री). 
वरीलप्रमाणे संबोधित केलेल्या व्यक्ती या ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये गणल्या जातात. 
आता अशा प्रकारे नात्यात राहणाऱ्या किंवा त्या नात्यापासून जन्माला येणाऱ्या अपत्यांबाबत कायद्यात काही तरतुदी दिलेल्या आहेत. खरेतर अशा नात्यांना समाजात आणि कायद्याने आता उघडपणे स्थान मिळू लागल्याने त्याबद्दल चर्चा होताना दिसते. या नात्याला कायदेशीर चौकटीत बघायचे झाले तर - 

लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे असे नाते  
१. ज्यामध्ये २ प्रौढ व्यक्तींमध्ये लग्नाव्यतिरिक्त शारीरिक संबंध येतात. 
२. असे संबंध हे खूप छोट्याशा कालावधीपुरते नाहीत, तर जे संबंध बऱ्याच कालावधीसाठी अस्तित्वात राहतात. या नात्यांमध्ये कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. 
३. अशा नात्यांमध्ये राहताना जिथे दोन्ही व्यक्तींच्या नावे एकत्रित बॅंक खाती, गुंतवणूक किंवा व्यापार हे आर्थिक सोयीनुसार केले जातात. 
४. अशा नात्यांमध्ये घरगुती सोय ही बघितली जाते. उदा. घर चालवणे, स्वयंपाक करणे, साफसफाई करणे. जसे की, नवरा बायको म्हणून राहताना घराची काळजी किंवा एकमेकांची काळजी घेतली जाते. 
५. अशा नात्यांमधील व्यक्ती या काही ठरावीक कालावधीसाठी दोन्ही व्यक्ती एकच म्हणजेच सामाजिक घरामध्ये नवरा-बायकोसारखे राहतात. 
६. अशा नात्यांमध्ये लग्न न करता मुले जन्माला येतात. 
७. अशा नात्यातील व्यक्ती या समाजामध्ये नवरा-बायकोसारखे ओळखले जातात. 
८. अशा नात्यांमध्ये दोन्ही व्यक्तींचा समाजातील वावर, त्यांचा उद्देश आणि हेतू हाही लक्षात घेतला जातो. 

वरील काही ठळक मुद्दे समाजामध्ये लिव्ह इन रिलेशनशिप या नात्याला ओळख देणारे आहेत. कायद्याच्या भाषेत बघितले तर २ अशा प्रौढ व्यक्ती ज्या स्वतःच्या मर्जीने, इच्छेने समाजामध्ये एकाच छताखाली नवरा-बायकोसारखे राहतात. परंतु, त्यांच्यामध्ये वाद झाला तर अशा नात्यांसाठी कायदेशीर तरतुदी काय आहेत; त्या आपण थोडक्‍यात बघू. 
१. अशा नात्यांमध्ये राहणाऱ्या स्त्रीला (जिला उत्पन्नाचे साधन नाही) आपल्या पार्टनरकडून कायदेशीर पोटगी मागता येते. इथेही आता हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की, फक्त पोटगीच मागता येते. तेसुद्धा अशा व्यक्तींना आपण ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होतो/आहोत, हे कायद्याने सिद्ध करावे लागते. किंवा प्रथमदर्शनी विश्‍वासार्ह असे पुरावे असावे लागतात. आता आपण ४२ कलम १२५ सी.आर.पी.सी.प्रमाणे बघितले, तर इथे बायकोला घटस्फोटानंतरही दुसरे लग्न होईपर्यंत पोटगी मागण्याचा अधिकार आहे. पण, लिव्ह इनमध्ये घटस्फोट होत नाही. कारण, ते लग्न अस्तित्वात नसते. म्हणून १२५ प्रमाणे पत्नी म्हणून पोटगी मागता येत नाही. परंतु, Domestic Violence Act प्रमाणे अशा नात्यातील स्त्रीला पोटगी मागता येते. तसेच, अशा नात्यांमध्ये भारतीय दंडविधान कलम ‘४९८ अ’सुद्धा लागू होत नाही. कारण, सदरचे नाते हे पती-पत्नीचे नसते. अशा नात्यातून जन्माला येणाऱ्या मुलांना मात्र कायदेशीर वैधता प्राप्त होते. कारण, अशा नात्यातून जन्माला येणाऱ्या मुलांचा यामध्ये काही दोष नसतो. मग त्या मुलांना कायद्याने सर्व हक्क प्राप्त करून दिले आहेत. अगदी वारसाने आलेले जंगम/स्थावर मालमत्तेतही त्यांना हिस्सा प्राप्त होतो. कायद्यामध्ये दुरुस्ती करून अशा प्रकारे बदल हा काही अंशी अनैतिक संबंधांना आळा घालण्यातही महत्त्वाची भूमिका बजावतो. 

अशा नात्यांमध्ये येतानाही दोन व्यक्तींची इच्छा असणे आणि त्यातून वेगळे होतानाही दोघांची इच्छा असते. इथे कायदेशीर प्रक्रिया काही नाही. त्यात एक सर्वांत महत्त्वाचा मुद्दा जो सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केला तो म्हणजे, लग्न करताना मुलाचे वय २१ पूर्ण आणि मुलीचे वय १८ असायलाच हवे. पण, लिव्ह इनमध्ये ते राहू शकतात लग्न न करता. 

लग्नाचे वय नसेल तरीपण लिव्ह इनमध्ये राहायचा त्यांना अधिकार आहे. अशा नात्यांमध्ये आजकाल एकमेकांची अनुकूलता तपासणीसाठी देखील एकत्र राहतात आणि त्यानंतर लग्न करायचे किंवा नाही, याचा निर्णय घेतात. समाजातील बदलत्या सामाजिक निकषांप्रमाणे समाजातील प्रत्येक थरामध्ये आज कायदेशीरपणा म्हणजे भूतकाळात जे जे अनौरस/युक्तिवादाला धरून होते, ते ते समाजात आज औरस धरून आहे, असे मानले जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.