हल्ली कलात्मक कवायतींच्या फुटकळ कलादर्शनातही गर्दी आनंद मानते. ती फक्त गर्दी असते. कर्कश्श आवाजातही किंचाळणारी, बेभान होऊन नाचणारी. त्या गर्दीला ना आचार असतो ना विचार. ते फक्त तालात लयबद्ध हालचाल करणारे काही बेधुंद देह असतात. त्या देहांच्या बुद्धीला कुणीतरी कोंडवाड्यात कैद केलेले असते. असा बुद्धीचा तुरुंगवास झालेली ही गर्दी हल्ली वाढतेय. समाजाची वैचारिक बांधणी सैल होत चालल्याचे हे निदर्शक आहे.